दुधाळ जनावरांसाठी आधुनिक आहार पद्धती 2024

दुधाळ जनावरांसाठी आधुनिक आहार पद्धती Modern feeding methods for dairy cattle

दुधाळ जनावरांसाठी आधुनिक आहार पद्धती

सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. उच्च दूध देणाऱ्या गाई व म्हशींच्या आहार व्यवस्थापनात युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक एक्सोजेनस एन्झाइम आणि चयापचय आणि किण्वन सुधारकाचा वापर फायद्याचा ठरतो. यामध्ये एक्सोजेनस एन्झाइम्सचा वापर पिकांच्या अवशेषांच्या चांगल्या वापरासाठी आहे.

हे एन्झाइम्स प्रामुख्याने सेल्युलोज, हेमिसेल्युलोज किंवा बुरशीजन्य असतात. एन्झाइम पावडर, दाणेदार किंवा द्रव स्वरूपात असू शकतात. ते खाण्याआधी चाऱ्यावर फवारणी केल्यास प्रभावीपणे काम करतात. एन्झाइम्स आहारात मिसळल्यामुळे रुमेनची हायड्रोलाइटिक क्षमता वाढते. वाढीसाठी आवश्यक असलेल्या सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. तसेच पोषक तत्त्वांचा वापर, खाद्य कार्यक्षमता, वाढीचा दर, दुधाचे उत्पन्न आणि त्याची रासायनिक संरचना सुधारण्यासाठी जनावरांना खायला दिले जाते, इंजेक्शन दिले जाते. किण्वन सुधारक खाद्यामध्ये रुमेन किण्वन हाताळण्यासाठी वापरली जातात.

रवंथ करणाऱ्या जनावरांच्या रुमेनमध्ये मोठ्या प्रमाणात फायदेशीर सूक्ष्मजीव असतात, जे खाद्याच्या तंतुमय घटकांचे पचन करण्यास मदत करतात. हिरव्या चाऱ्याच्या टंचाईच्या काळात, युरिया मोलासेस मिनरल ब्लॉक जनावरांच्या पोटाच्या रुमेन च्या भागातील सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास मदत करते. तसेच युरियाचे कमी प्रमाणात सेवन केल्याने अधिक प्रमाणात जैव-प्रथिने तयार होतात, त्यामुळे जनावराची पचनक्रिया सुधारते. नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड ने ( एनडीडीबी) युरिया मोलॅसेस मिनरल ब्लॉक तयार करण्याची ‘कोल्ड प्रोसेस’ विकसित केली आहे.

दुधाळ जनावरांसाठी आधुनिक आहार पद्धती 2024

दुधाळ जनावरांसाठी आधुनिक आहार पद्धती

पशुपालनात पशुप्रजननाच्या (पशुपैदाशीच्या) इतकेच किंबहुना थोडे अधिक महत्त्व पशुखाद्याला देणे सयुक्तिक ठरेल. मानवी आहाराप्रमाणे पशुखाद्याचा उपयोग पशुंचे शरीरपोषण, त्यांची वाढ, उष्णता व ऊर्जा उत्पन्न करणे, क्षणोक्षणी होणारी शरीराची झीज भरून काढणे यांकरिता तर होतोच, शिवाय अप्रत्यक्षपणे दूध, मांस, अंडी व लोकर यांचे उत्पादन आणि शेतीच्या व वाहतुकीच्या कामांसाठी चलशक्ती पुरविण्यासाठीही होतो.

पशुखाद्य या विषयाचा प्रत्यक्ष संबंध पशुपोषण या विषयाशी असला, तरी पर्यायाने जीवरसायनशास्त्र ( सजीवामध्ये होणा-या रासायनिक स्थित्यंराच्या अभ्यासाचे शास्त्र) व पशूंचे शरीर क्रियाविज्ञान (शरीरातील कार्य व क्रिया कशा चालतात याच्या अभ्यासाचे शास्त्र ) या शास्त्रांशी येतो. शौकाकरिता पाळलेली कुत्री, मांजरे यांसारखे प्राणी सोडल्यास पशुपालन हे प्रायः

उत्पादनाच्या म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून केले जात असल्यामुळे थोड्या खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करणे क्रमप्राप्त होते. पशुपालनामध्ये खाद्यावर

होणा-या खर्चाचे प्रमाण ६० ते ८० पर्यंत आहे. उत्पादनाच्या रूपाने या खर्चाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी निरनिराळ्या पशूंच्या पचन तंत्रांचा ( पचन संस्थांचा) अभ्यास करून खाद्यातील कोणते पोषक घटक कोणता पशू अधिक कार्यक्षमतेने पचवू शकतो, तसेच विविध खाद्यपदार्थात कोणते पोषक घटक किती प्रमाणात आहेत यांचा अभ्यास होणे अपरिहार्य होते. मानव भटक्या अवस्थेत राहत असताना स्वतःसाठी, तसेच त्याने पाळलेल्या पशूंसाठी नैसर्गिक खाद्याच्या शोधात फिरत असे.

पुढे तो शेती करून राहू लागल्यावर पिकातील धान्य वगळता उरलेला भाग पशुखाद्य म्हणून वापरू लागला आणि त्याची साठवण करू लागला. उत्तर यूरोपमध्ये बीटची पाने किंवा मक्याची ताटे जमिनीत पुरून साठविण्याची पद्धत • अनेक वर्षांपासून प्रचारात होती असे दिसते.

सर्वसाधारणपणे शरीरपोषणासाठी मनुष्यमात्रास लागणारे खाद्यातील पोषक घटक पशूंनाही आवश्यक आहेत ड ? पोषण. वस्तुतः वनस्पतींमध्ये आढळणा-? या मूलघटकद्रव्यांपासूनच पशूंची शरीरे बनलेली आहेत. ढोबळमानाने निरनिराळ्या जातींच्या पशूंच्या शरीररचनेत फारसा फरक दिसत नसला, तरी त्यांच्या पचन तंत्रातील थोड्याफार फरकामुळे खाद्यातील विविध पोषक घटकांच्या जरूरीमध्ये फरक आढळून येतो. पशुखाद्यांमध्ये अनेक पदार्थांचा समावेश होतो.

दुधाळ जनावरांसाठी आधुनिक आहार पद्धती 2024

या पदार्थांच्या रासायनिक रचनेमध्ये विविधता आढळते, तसेच त्यांच्या पोषणमूल्यांकामध्येही फरक असतो. असे असले तरी सर्व पदार्थांतील पोषणोपयोगी घटक मात्र प्रथिने, कार्बोहायड्रेटे (पिष्टमय पदार्थ), वसा (स्निग्ध पदार्थ अथवा चरबी), खनिजे व जीवनसत्त्वे हेच असतात. यांतील प्रत्येक घटकाचे पोषणातील कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहेच परंतु जीवनावश्यकही आहे. याचाच अर्थ यातील कुठल्याही घटकाची उणीव असल्यास पशूंचे योग्य पोषण होणार नाही, आणि ते दुर्बल राहतील व त्यांच्यापासून होणारे उत्पादन घटेल. इतकेच नव्हे, तर त्यांचे आरोग्य बिघडून क्वचित ते रोगाला बळी पडण्याचा संभव आहे.

पशूंच्या आहारशास्त्राप्रमाणे त्यांच्या पोषणासाठी खाद्यामध्ये पुढील पोषक घटकांची आवश्यकता आहे : (१) पाणी, (२) प्राथिने, (३) कार्बोहायड्रेटे, (४) वसा, (५) खनिजे व (६) जीवनसत्त्वे, पाणी खाद्यातील इतर पोषक घटकांशिवाय पशू काही काळ जिवंत राहू शकेल पण पाण्यावाचून मात्र तो फार दिवस जगू शकणार नाही. निरनिराळ्या पशूंना लागणा-?या पाण्याचे प्रमाण त्यांचे आकारमान, वय, वजन, त्यांना मिळणारा आहार, त्यांच्यापासून अपेक्षित उत्पादन, त्यांना करावे लागणारे काम, हवेचे तापमान इ. गोष्टींवर अवलंबून असते. लहान वयाच्या जनावरांना त्यांच्या वजनाच्या मानाने वयस्क जनावरांपेक्षा अधिक पाणी लागते.

 

दुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचार mastitis-symptoms-and-treatment-in-dairy-cattle 2024

https://mahakrushi.cloud

 

Leave a Comment