दुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचार
आपल्या देशातील दुग्ध व्यवसाय जसाजसा वाढत आहे. तसातसा प्रति जनावर दुग्धोत्पादन वाढीसाठी पुष्कळ प्रयत्न केले जातात. जनावर शरीराने निरोगी आहे. पण कास निरोपयोगी असेल तर असे जनावर असून नसल्यासारखे असते. कारण वरुन चांगले दिसणारे हे जनावर दुध देवू शकत नाही. म्हणूनच कासांच्या आरोग्यासाठी पशुपालकाने सदैव दक्ष राहणे आवश्यक आहे.
स्तनदाह हा मुळातच जनावरांचे व्यवस्थापन चांगले न झाल्याने होणारा आजार आहे. जनावरांमध्ये स्तनदाह विविध कारणामुळे होतो. जनावरांची कास जीवजंतुच्या संसर्गाला अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे असंख्य प्रकारचे वाणू, विषाणू यांच्या प्रादुर्भावामुळे स्तनदाह होतो. दुध काढण्याची चुकीची पध्दत दुध काढणाऱ्या व्यक्तीची अस्वच्छता, जनावरांची अस्वच्छता, गोठ्यातील घाण या गोष्टीही स्तनदाह होण्यासाठी कारणीभूत ठरतात.
हा रोग होण्याचे आणखी कारण म्हणजे कास मोठी व लोबती असणे, सडांचे छिद्र मोठे असणे, अपुरे दुध काढणे, आहारात प्रथिनाचे प्रमाण जास्त असणे इत्यादी असु शकतात. हा रोग संसर्गीक व असांसर्गिक या दोन्ही प्रकारात मोडतो, या रोगात कास दगडासारखी टणक होत असल्यामुळे त्या रोगाला दगडी असे ही म्हणतात.
दुधाळ जनावरांतील कासदाह / स्तनदाह (मस्टायटीस) आजार
दुग्धव्यवसायामध्ये स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्व आहे. दुग्धव्यवसाय फायदेशीर राहण्यासाठी त्रिसूत्रि स्वच्छतेची अत्यंत गरज आहे.
दुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचार mastitis-symptoms-and-treatment-in-dairy-cattle
त्यामध्ये दूध काढणारी व्यक्ति, दुधाळ जनावर व जनावरा सभोवतालचे वातावरण (गोठा) या तीन गोष्टी सदैव स्वच्छ असल्या पाहिजेत. तिन्ही गोष्टीपैकी कोणत्याही एकामध्ये दोन किंवा तीन गोष्टीमध्ये विसंगती झाल्यास दुधाळ जनावरामध्ये कासदाह आजार होतो.
कासदाह आजार दुधाळ गायी, म्हशी, शेळ्या या प्राण्यात सर्वसामान्यपणे आढळतो. जास्त दूध देणाऱ्या संकरीत गायी व म्हशीमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असून शेळ्यामेंढ्यामध्ये याचे प्रमाण कमी असते.
या आजारामध्ये जनावरे दगावत नाहीत परंतु जनावरांच्या दुग्धउत्पादन क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. या आजारामध्ये एकतर जनावरांचे दुग्धोत्पादन घटते (70% नुकसान) तसेच आजाराच्या उपचारामध्ये दूध काढून फेकून द्यावे लागते (9% नुकसान), उपचारासाठी औषधावरील खर्च (7% नुकसान) जास्त असतो व बऱ्याचदा आजाराची तीव्रता जास्त असल्यास अशी जनावरे उपचाराला प्रतिसाद देत नाहीत व नाईलाजाने जनावरे कमी किंमतीत विकावी लागतात (14% नुकसान).
या आजारामुळे जनावरांत एखादे सड निकामी झाल्यास त्या जनावरांची 25% रक्कम बुडाली असे समजावे. कासदाह झालेल्या जनावरांपासून काढलेले दूध पिणे माणसास हानिकारक आहे यामुळे घश्याचा दाह, जुलाब, क्षयरोग व ब्रुसेल्लोसिस सारखे आजार होवू शकतात.
काही अपवाद वगळता, जेव्हा सूक्ष्मजंतू टीट कॅनालद्वारे टिटमध्ये प्रवेश करतात तेव्हा स्तनदाह होतो.
दुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचार mastitis-symptoms-and-treatment-in-dairy-cattle
उपचार किंवा उपाय :
स्तनदाहमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी गुरांना स्तनदाह रोगमुक्त राखणे अत्यंत गरजेचे आहे.
त्याकरिता खालील प्रमाणे उपाययोजना करावेत.
1) गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी व कासेला इजा होईल अशा वस्तु तेथे नसाव्यात.
२) धार काढण्यापूर्वी जनावरांची कास स्वच्छ व कोमट पाण्याने धुऊन घ्यावी.
लक्षणे :
१) शरीराची तापमान वाढते.
२) जनावर चारा पाणी खात नाही
३) कासेतील वेदनेमुळे जनावरास उठ बस करताना
चालताना त्रास होतो.
४) कास एकाकी दगडाप्रमाणे टणक होते.
५) कास सुजते.
६) गुरे सुस्त होतात.
७) दुध उत्पादन घटते.
८) कधी-कधी पाण्यासारखे पातळ तर कधी रक्त मिश्रीत दुध येते. स्वच्छ व मऊ कपड्याने पुसावी.
३) पूर्ण दुध काढून झाल्यावर कास पुन्हा एकदा पोटॅशियम परमॅग्नेट पाण्यात टाकून त्या पाण्याने धुवून काढावी.
४) दुध काढणाऱ्या व्यक्तीची वैयक्तिक स्वच्छता, दोहणापूर्वी हात, पाय स्वच्छ धुणे निर्जंतुकीकरण करणे इत्यादीची काळजी घ्यावी.
५) गायी, म्हशीच्या कासाला झालेल्या जखमातून रोगजंतु कासेत प्रवेश करतात. त्यामुळे कासेच्या जखमेवर ताबडतोब इलाज करावा.
६ ) आंगठा मुडपून दुध काढू नये.
७) दुध संकलनाच्या वेळी हाताला थुंकी लावू नये. थुंकीव्दारे रोगजंतुचा प्रसार कासात होवू शकतो.
८) दोहणानंतर वासरास बराच वेळ पिवू दिल्यास दुध सपल्यानंतर वासरु सडांचा चावा घेते, जखमा होतात व त्यातूनही स्तनदाह होवू शकतो. ९) दोहणानंतर जनावरांना चारा द्यावा.
१०) प्रत्येक सडाच्या दुधाची चाचणी स्वतंत्रपणे साधारणतः दोन, तीन, आठवड्याच्या अंतराने करावे.
११) स्तनदाह बाधीत गुरांची दोहारी शेवटी करावी व ते दुध इतर दुधात मिसळू नये.
१२ ) गोठ्यात जंतु नाशकाची व किटकनाशकाची फवारणी अधूनमधून करावी.
१३) दुधाळ जनावर विकत घेताना स्तनदाह चाचणी करावी.
दुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचार mastitis-symptoms-and-treatment-in-dairy-cattle
जवळजवळ कोणताही सूक्ष्मजीव संधीसाधूपणे टीट कालव्यावर आक्रमण करू शकतो आणि स्तनदाह होऊ शकतो. तथापि, बहुतेक संक्रमण स्ट्रेप्टोकोकी (किंवा तत्सम ग्राम-पॉझिटिव्ह कोकी), स्टॅफिलोकोकी आणि ग्राम-नकारात्मक रॉड्सच्या विविध प्रजातींमुळे होतात, विशेषत: आंतरीक मूळचे लैक्टोज-किण्वन करणारे जीव, सामान्यतः कॉलिफॉर्म म्हणतात . महामारीविज्ञानाच्या दृष्टिकोनातून, बहुतेक रोगजनकांसाठी संसर्गाचे प्राथमिक जलाशय संक्रामक किंवा पर्यावरणीय मानले जाऊ शकतात, जरी काही रोगजनकांसाठी हे वेगळे होणे अस्पष्ट असू शकते.
प्रा. झिया-उर-रहेमान ए. आर.दुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचारदुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचारदुभत्या जनावरामधील स्तनदाह लक्षणे व उपचार
सहाय्यक प्राध्यापक कृषी महाविद्यालय नेहरुनगर कंधार ता. कंधार जि. नांदेड
कृषी तंत्रज्ञान
शेती पिके
बाजारभाव
योजना
ताज्या बातम्या
Pingback: दुधाळ जनावरांसाठी आधुनिक आहार पद्धती 2024 - 🌾महा कृषी पोर्टल 🌾